रामदेव बाबा आता भगवे कपडे घालून जीन्स आणि बूट विकणार, अशी खोचक टीका काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी केली आहे. रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या पतंजली समूहाच्या माध्यमातून वस्त्रोद्योगात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांनी ट्विटरद्वारे रामदेव बाबांचा समाचार घेतला.