दसऱ्याच्या दिवशी भगवानगडाच्या पायथ्यावरून केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्याचे दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी गुरुवारी एक पाऊल मागे घेत आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचे म्हटले आहे.