पुणे रेल्वेस्थानकावर मंगळवारी सायंकाळी शेकडो स्थलांतरितांनी आपल्या गावाकडे जाण्यासाठी गर्दी केली होती. पीएमपीएमएलच्या बसद्वारे त्यांना रेल्वे स्थानकात सोडण्यात आले होते. यानंतर रेल्वे स्थानकाबाहेर या बसेसची रांग लागली होती. तर रेल्वे स्थानकात श्रमिक स्पेशल ट्रेनद्वारे उत्तर प्रदेशला रवाना होण्यासाठी स्थलांतरित मोठ्यासंख्येन रांगेत उभे होते.