राज्य सरकारने लॉकडाउनपश्चात प्रार्थनास्थळं खुली करण्याला परवानगी दिली आहे. तब्बल ८ महिन्यांनंतर पुण्यातील सेंट पॅट्रीक्स चर्चमध्ये ख्रिश्चन धर्मीय नागरिकांनी हजेरी लावून प्रार्थना केली. यावेळी राज्य सरकारच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात येत होतं.