माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) कारवाई केली जात असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरेंनी यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात असल्याची टीका करतानाच एकनाथ खडसेंनाही टोला लगावला आहे.