रक्षाबंधनासाठी भारतीय डाकने विशेष वॉटरप्रुफ लिफाफे उपलब्ध करून दिले आहेत. आपल्या देशात रक्षाबंधन या सणाला खूप महत्त्व आहे. अनेक बहिणी आपल्या लांब राहणाऱ्या भावासाठी राख्या पाठवतात. अशा वेळी पावसामुळे या राख्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मेरठच्या पोस्ट ऑफिसने वॉटरप्रुफ लिफाफ्यांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.