उद्धव ठाकरेंचा राजीनामा आणि विश्वासदर्शक ठराव; मुनगंटीवारांनी दिला पवारांच्या विधानाचा संदर्भ
गुरुवारी (११ मे) सुप्रिम कोर्टाने सत्तासंघर्षावर महत्त्वपूर्ण निकाल देत उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित केला. ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार परत येण्याची शक्यता होती, असं मत कोर्टाने व्यक्त केलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी (९ मे) लोकसत्ताच्या ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरेंच्या राजीनाम्याबद्दल
बोलताना शरद पवारांच्या विधानाचा संदर्भ दिला होता.