पाण्यासाठी आईची रोजची होणारी वणवण पाहता १४ वर्षांच्या प्रणव साळकरने चक्क विहीरचं खोदली. आपल्या आईचा त्रास कमी व्हावा यासाठी प्रणवने वडिलांच्या मदतीने घराजवळ विहीर खोदली. पालघरच्या कळवे येथील दावांगे पाडा येथे हे कुटुंब राहतं. प्रणवच्या या कामगिरीचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.