चर्चगेट वसतीगृह बलात्कार प्रकरण; चित्रा वाघ यांनी दिली ‘ही’ माहिती
मरीन ड्राईव्ह येथील एका वसतीगृहात १८ वर्षीय तरुणीवर सुरक्षा रक्षकाने लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसंच त्या सुरक्षा रक्षकाने देखील आत्महत्या केली. या प्रकरणाने एकच खळबळ माजली असून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी वसतीगृहाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला