राज्यातील शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्तारावर आणि जाहिरातींच्या वादावर राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “मंत्रिमंडळ विस्ताराचे आपण वर्षभर ऐकतोय. जाहिरातीच्या माध्यमातून कलगीतूरा लागलाय ते करू नये. दुसऱ्या दिवशी परत जाहिरात द्यावी लागली. कोण करतंय याची कल्पना नाही. यामुळे पक्षाचे कार्यकर्ते दुखावले जाताय. काम बाजूला राहताय. फेव्हिकॅाल हा खरा असला पाहिजे, नाहीतर तुटतात”



















