‘राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्हाला विश्वासात घेऊन आपल्याला सरकारमध्ये सामील व्हावं लागणार आहे. आपल्याला सत्तेमध्ये जायचं आहे. आपल्या भागातील काम पूर्ण करायची असतील तर सत्तेत जाणं हा योग्य पर्याय वाटतो अस सांगितलं होतं. ही सर्व चर्चा अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर झाली’ असं स्पष्टीकरण मावळमधील राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केलं आहे. ते तळेगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.