पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (१ ऑगस्ट) पुणे दौर्यावर येत आहेत. मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी ते शहरात येत आहेत. प्रथम ते श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. यावेळी मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान केला जाणार आहे. दरम्यान, मणिपूरचा मुद्दा पेटलेला असताना मोदी उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती लावत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासह अन्य संघटनाच्या प्रतिनिधींनी मोदींच्या दौऱ्याला विरोध दर्शविला असून मंडई चौकात आंदोलन केलं जात आहे. याबाबत काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी प्रसार माध्यामांना प्रतिक्रिया दिली आहे.