Sanjay Raut: ‘घटनाबाह्य सरकारला विधानसभेचे अध्यक्ष चालवतायत का?’; संजय राऊतांचा हल्लाबोल
शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला. उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं. मात्र, या निर्णयाला ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून त्यावर आजपासून सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठानं चार महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयासंदर्भात नियम पाळले जाण्याची टिप्पणी केली होती. या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे.