Rohit Pawar: भाजपाला कुठलाही लोकनेता आवडत नाही; रोहित पवारांचं सूचक विधान
राष्ट्रवादीचे अनेक नेते हे बंड करून भाजपासोबत सत्तेत सामील झाले आहेत. त्यातील काही नेत्यांना भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकतं, असं वक्तव्य रोहित पवार यांनी पिंपरी- चिंचवडमध्ये केलं आहे. तीच परिस्थिती अजित पवार यांच्यावर देखील येऊ शकते का? या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार यांनी भाजपाला लोकनेते आवडत नाहीत. भाजपाने अनेक लोकनेत्यांना संपवलं आहे. त्यामुळे भाजपाने वरपासून खालपर्यंतच्या नेत्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायचं असं ठरवलं तर ते होऊ शकतं, असं सूचक विधान रोहित पवारांनी केलं आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.