Ambadas Danve on Mla Disqualification: आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवरून दानवेंची टीका
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बंडखोर आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. नार्वेकरांनी मध्यंतरी कुणाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांना कुणी काय मार्गदर्शन केलं याची माहिती घेतली पाहिजे, असं दानवेंनी म्हटलं. तसेच त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे असा प्रश्ना उपस्थित केला. ते मंगळवारी (२६ सप्टेंबर) नागपूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.