महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणी विरोधकांनी आता सरकारला धारेवर धरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संबधित मंत्र्याचा राजीमाना घ्यावा, अशी मागणी केली आहे. तसंच सर्वांनी मिळून महाराष्ट्र सरकारवर या प्रकरणी गुन्हा दाखल केला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.