पाचपैकी चार राज्यांच्या विधानसबा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले असून त्यापैकी तीन राज्यांमध्ये भाजपाने काँग्रेसविरोधात मोठा विजय मिळवला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. तर तेलंगणामध्ये काँग्रेसनं केसीआर यांच्या १० वर्षांच्या सत्ताकाळावर पूर्णविराम लावत रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली बहुमत प्राप्त केलं. या पार्श्वभूमीवर देशभरात भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीत भाजपा मुख्यालयात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसमोर सविस्तर भूमिका मांडली.