राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा-शिवसेनेच्या पूर्वयुतीवरून वक्तव्य केले आहे. “ज्यावेळेस बाळासाहेब होते, तेव्हा शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात होती. त्यावेळेस मोठा भाऊ म्हणून शिवसेना वाटत होती. मात्र, २०१४ नंतर भाजपा शिवसेनेची ताकद कमी करत गेली. अपक्ष उमेदवार उभा करणार असेल किंवा शिवसेनेचे उमेदवार पाडणे असेल अशा खेळ्या भाजपाने केल्या” अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.