खासदार नवनीत राणा यांनी संसदेत “इस देश मे रहना है तो जय श्रीराम बोलना पडेगा” अशा आशयाचं विधान केलं होतं. यावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खासदार नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीत पाडण्याची भाषा केली होती. यावरून खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील हळदी कुंकू कार्यक्रमात इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे. इम्तियाज जलील यांच्यासारखे किती आले आणि किती गेले असे म्हणत त्यांनी ते ओवेसी यांचा चमचा आहेत अशी सुद्धा टीका केली आहे.