राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या तुतारी चिन्हाचं आज किल्ले रायगडावरून अनावरण करण्यात आलं. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. ही तुतारी एका संघर्षाची सुरुवात करण्याची प्रेरणा देणारी आहे, असं शरद पवार यावेळी म्हणाले.