UPI Payment Chargeback System: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात NPCI ने केलेला हा बदल युजर्सच्या प्रत्यक्ष वापराच्या प्रक्रियेत झालेला नसून व्यवस्थेच्या तांत्रिक बाबीत करण्यात आला आहे. पण त्याचा फायदा मात्र युजर्सला थेट होणार आहे. हा बदल यूपीआय पेमेंटसंदर्भातील Chargeback अर्थात पैसे परताव्याबाबत लागू करण्यात आला आहे.