पोलिसांकडून सखोल तपास चालू असतानाच यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खळबळजनक आरोप केला आहे. आरोपी महिला व तिच्यासोबतचे सहकारी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपर्कात असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. त्यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केलं आहे.