BJP Former MP Denied Entry In Ram Mandir: देवळीतील राम मंदिरात भाजपचे माजी खासदार रामदास तडस हे सपत्नीक दर्शनासाठी गेले असता त्यांना चक्क मंदिरातील पुजाऱ्यांनी अडवल्याचा प्रकार घडला आहे. गावात राम नवमीची धुमाधाम सूरू असतांना रामदास तडस व त्यांच्या पत्नी शोभा तडस तसेच काही भाजप पदाधिकारी हे राम दर्शनास या मंदिरात पोहचले. त्यावेळी पूजा सूरू होती. मूर्तिच्या पूजेसाठी तडस हे गर्भ गृहात शिरत असतांना पुजाऱ्याने त्यांना रोखले. मूर्तिची पूजा करता येणार नाही, तुम्ही जरा लांबच रहा, असे बजावले.