वैष्णवीच्या वडिलांनी स्वखुशीने गाडी आणि दागिने दिले, असा दावा हगवणेंच्या वकिलांनी न्यायालयात केला. त्यावर उत्तर देताना वैष्णवीच्या चुलत्यांनी हगवणेंनी ५१ तोळं सोनं आणि गाडी मागितली, असा खुलासा केला आहे. त्यांच्या अनाठायी मागण्या पूर्ण करण्यासाठी बिल्डरकडून अॅडव्हान्स पैसे घेतल्याचंही वैष्णवीचे चुलते म्हणाले.