वैष्णवी हगवणे प्रकरणावरून सध्या राज्य महिला आयोगाच्या कामगिरीवर अनेकांनी टीका केली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या प्रवक्ता रुपाली पाटील ठोंबरे यांनी देखील राज्या महिला आयोगावर स्वतंत्र व्यक्ती असावी असं म्हणत चाकणकरांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.