५ व ६ जून तारखेनुसार आणि ८ व ९ जून रोजी तिथीनुसार किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने रायगड पोलीस व जिल्हा प्रशासन यांची नियोजनपर संयुक्त बैठक घेण्यात आली. किल्ले रायगडावर पाहणी देखील करण्यात आली आहे. पाचाड व किल्ले रायगड परिसरात वाहतूक व्यवस्था व सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी सोहळ्यानिमित्त काय तयारी करण्यात आली आहे याची माहिती पोलीसांनी दिली.