Samruddhi Highway: मुंबई-नागपूर दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७६ किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण आज (५ जून) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. इगतपुरी येथील बोगद्यातील उत्तरेकडील मार्गिकेवर नुकताच हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.