दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे अशी चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि मनसेचे पदाधिकारी एकत्र आले आहे. नाशिक मधील मनसेच्या राजगड कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर गुरुवारी वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी मनसे कार्यालयत आले या दरम्यान ठाकरे गटाकाडून एक फोटो फ्रेम आणण्यात आली होती. या फोटोनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.