POP Ganesh Idol New Decisions By High Court: पीओपीच्या गणेशमूर्तींबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने स्वागत केले आहे. मात्र सार्वजनिक गणेश मंडळांच्या उंच मूर्तीचे विर्सजन कसे करणार याबाबत आता नवा पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या मूर्तीच्या विसर्जनासंदर्भात राज्य सरकारने फेरविचार करावा, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.