राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २६व्या पर्धापन दिनाचा कार्यक्रम आज पुण्यात पार पडला. यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. अनेकदा प्रवक्ते, आमदार माहिती नसताना बरंच काही सांगायचा प्रयत्न करतात. फार महत्त्वाचे प्रश्न विचारले तर सरळ सागांवं यावर वरिष्ठ नेते बोलतील. आम्ही बोलायला खंबीर आहोत. नाहीतर कारण नसताना वेगळे प्रश्न निर्माण होतील, असं अजित पवार म्हणाले.