भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी-हिंदी वादावर बोलताना महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, असं वादग्रस्त विधान केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष यांनी बुधवारी हा विषय पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलताना काढला. त्यावेळी त्यांनी झारखंडच्या बजेटची आकडेवारी देत कशाच्या जोरावर भाजपाच्या खासदाराने महाराष्ट्राबाबत असं विधान केल्याचा प्रश्न जयंत पाटलांनी उपस्थित केला.