मनपातील स्वीकृत सदस्य कुलदीप ठाकूर यांच्यासह सुमारे ५० कार्यकर्त्यांनी भाजपचे लोकसभेतील उपनेते खा. गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
ठाकूर यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने त्यांना स्वीकृत नगरसेवकपद दिले होते. दोन महिन्यांपूर्वी काँग्रेस नेत्यांवर नाराजी व्यक्त करीत ठाकूर यांनी बंड पुकारले. त्याच वेळी ठाकूर भाजप प्रवेशाची तयारी करीत असल्याची चर्चा सुरू झाली होती. बुधवारी एमआयएमएसआर मेडिकल कॉलेज येथे मुंडेंच्या उपस्थितीत त्यांनी भाजपत प्रवेश करून चच्रेला पूर्णविराम दिला. या वेळी रमेश कराड यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. भाजपचे जुने कार्यकत्रे विवेक वाजपाई हेही काँग्रेसमधून भाजपत परतले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kuldeep thakur in bjp presence of gopinath munde