आपल्या शरीरात युरिक अॅसिड नावाचं एक नैसर्गिक द्रव्य तयार होतं. हे मूत्रपिंडांद्वारे बाहेर टाकलं जाणं आवश्यक असतं. पण काही वेळा मूत्रपिंड ते योग्य प्रकारे बाहेर टाकू शकत नाही आणि त्यामुळे शरीरात युरिक अॅसिड साचायला लागतं. अनेकांना हे माहीतच नसतं की, युरिक अॅसिड वाढलं तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे सांधेदुखी, थकवा, सूज अशा अनेक त्रासांना सुरुवात होते.