उत्तर प्रदेशातील इटावा शहराच्या उपनगरात असलेले ‘लायन सफारी पार्क’ पूर्वी पर्यटकांच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्र होते. परंतु, आता मात्र चित्र बदलत आहे. पुढील तब्बल २००० वर्षे इटावाची ओळख होऊ पाहत असलेल्या शिव मंदिराकडे पर्यटकांचे पाय वळत आहेत. या मंदिराचा आणि भारतीय राजकारणाचा नेमका संबंध काय याचा हा आढावा.