scorecardresearch

अरविंद केजरीवाल News

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि केंद्रशासित प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९६८ साली झाला. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ (IAC) मोहिमेचे ते सदस्य होते. २०१२ मध्ये आयएसी मोहिमेद्वारे जनलोकपाल विधेयक आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. केजरीवाल यांनी आयआयटी खरगपूरमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून ते व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी आयकर विभागाचे संयुक्त आयुक्त म्हणूनही काम केले आहे. परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील लोकांसाठी केलेल्या सामाजिक कामासाठी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१२ मध्ये केजरीवाल पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१५ आणि २०१९ सालीही आम आदमी पक्षाने दिल्लीत मोठा विजय मिळविला आणि अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीबरोबर पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचे सरकार आहे.


दिल्ली सरकारने करोना काळात नवे अबकारी धोरण आखून त्या माध्यमातून मनी लाँडरींग केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षातील इतर नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. हे धोरण नंतर रद्द केले असले तरी या गुन्ह्याखाली दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दीड वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही २१ मार्च २०२४ मध्ये अटक करण्यात आली. लोकसभेदरम्यान पक्षाचा प्रचार करण्यासाठी त्यांना काही दिवसांचा जामीन देण्यात आला होता. २०२४ च्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीत प्रवेश केला. मात्र त्यांना केवळ तीनच जागा जिंकता आल्या. आम आदमी पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या दिल्लीत काँग्रेस आणि ‘आप’ला एकही जागा जिंकता आली नाही.


ईडीच्या कारवाई आधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे नायब राज्यपाल यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. केंद्रीय गृहखात्याने दिल्ली सरकारला असलेले प्रशासकीय अधिकार काढून घेतल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि बदली करण्याचे अधिकार नायब राज्यपाल यांच्या हाती गेले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा नवा अध्यादेश काढून आपला निर्णय काम ठेवला.


Read More
Arvind Kejriwal residence, Delhi CM bungalow, Lutyens Delhi houses, Kejriwal election loss, Delhi political news, Rahul Gandhi Congress disputes,
चांदनी चौकातून : केजरीवालांना नवं घर

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून अरविंद केजरीवालांना पायउतार व्हावं लागण्यामागं त्यांच्या आलिशान घराचाही मोठा हात होता. मुख्यमंत्री असताना त्यांचं शीशमहल नावाच्या घरात वास्तव्य होतं.…

wealthiest men Rajinder Gupta is AAP nominee for Rajya Sabha
१०,००० कोटींची संपत्ती असणारा उद्योगपती होणार खासदार? केजरीवालांनी का सोडली खासदार होण्याची संधी?

Aam Aadmi Party Rajya Sabha ticket आम आदमी पार्टीने (Aam Aadmi Party) पंजाबमधील सर्वात श्रीमंत उद्योगपती राजेंद्र गुप्ता यांना राज्यसभेचे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (छायाचित्र पीटीआय)
‘राहुल गांधी भाजपाचे एजंट’ माजी मुख्यमंत्र्यांचा आरोप, काँग्रेसचे प्रत्युत्तर; इंडिया आघाडीत फूट?

Arvind Kejriwal AAP vs Rahul Gandhi : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे भाजपाचे एजंट असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाकडून…

Rekha Gupta
“आम्ही EVM हॅक केलं तर यांना वाईट वाटतंय”, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्तांना राहुल गांधींचा आरोप मान्य?

Rekha Gupta on EVM : दिल्लीच्या मुख्यमंत्री तथा भाजपा नेत्या रेखा गुप्ता म्हणाल्या, “७० वर्षांपासून हे लोक (काँग्रेस) ईव्हीएम हॅक…

Arvind Kejriwa
“शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही”, कापसाबाबतच्या मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर केजरीवालांचा संताप

Arvind Kejriwal on Modi Government : बहुसंख्य टेक्सटाइल कंपन्यांनी आधीच अमेरिकेवरून स्वस्त कापूस मागवला आहे. कारण सरकारने कापसावरील ११ टक्के…

amit shah arvind kejriwal ie
“…तर पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवू शकणाऱ्या विधेयकाची गरज पडली नसती”, अमित शाह केजरीवालांवर खापर फोडत म्हणाले…

Amit Shah on Arvind Kejriwal : लाचखोरी व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री अथवा एखाद्या मंत्र्याला सलग ३० दिवसांचा कारावास…

रेखा गुप्ता ते अरविंद केजरीवाल- हल्लेखोरांचा सामना करावा लागलेले मुख्यमंत्री

Man attacked Delhi CM Rekha Gupta: रेखा गुप्ता यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.…

आपचे नेते सत्येंद्र जैन यांना क्लिनचीट, नेमकं काय होतं हे प्रकरण? भाजपाने एक पाऊल मागे घेतलं?

AAP Satyendra Jain: हे प्रकरण १७ सदस्यांच्या क्रिएटिव्ह टीमच्या भरतीसंदर्भातील कथित भ्रष्टाचाराशी संबंधित होतं. ही टीम विविध प्रकल्पांसाठी पीडब्ल्यूडीमध्ये नियुक्त…

Arvind Kejriwal Nobel Prize Remark
Arvind Kejriwal: “मलाही नोबेल मिळायला पाहिजे”, केजरीवालांच्या मागणीची भाजपाकडून खिल्ली; म्हणाले, “मानसिक आरोग्य…”

Arvind Kejriwal Nobel: केजरीवाल म्हणाले की, “दिल्लीत आमचे सरकार सत्तेत होते तेव्हा आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागला. मुख्यमंत्री म्हणून…

आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल (छायाचित्र पीटीआय)
गुजरातमध्ये आम आदमी पार्टीच्या आमदाराला तडकाफडकी अटक; नेमकं काय आहे प्रकरण?

Gujarat AAP Mla Arrested : गुजरातमधील डेडीयापाडा मतदारसंघाचे आम आदमी पार्टीचे आमदार चैतार वसावा यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आम आदमी पार्टीचे अध्यक्ष व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (छायाचित्र पीटीआय)
गुजरामधील विजयानंतर ‘आप’ने ७२ तासांतच केली आमदाराची हकालपट्टी; कारण काय? प्रीमियम स्टोरी

MLA Umesh Makwana News : गुजरातच्या विसावदर विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर आम आदमी पार्टीने ७२ तासांतच आमदाराची पक्षातून हकालपट्टी केली.

ताज्या बातम्या