Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

अरविंद केजरीवाल Photos

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक आणि केंद्रशासित प्रदेश दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा जन्म १६ ऑगस्ट १९६८ साली झाला. देशातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ (IAC) मोहिमेचे ते सदस्य होते. २०१२ मध्ये आयएसी मोहिमेद्वारे जनलोकपाल विधेयक आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यानंतर त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन केला. केजरीवाल यांनी आयआयटी खरगपूरमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून ते व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी आयकर विभागाचे संयुक्त आयुक्त म्हणूनही काम केले आहे. परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी तळागाळातील लोकांसाठी केलेल्या सामाजिक कामासाठी त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१२ मध्ये केजरीवाल पहिल्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१५ आणि २०१९ सालीही आम आदमी पक्षाने दिल्लीत मोठा विजय मिळविला आणि अरविंद केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीबरोबर पंजाबमध्येही आम आदमी पक्षाचे सरकार आहे.


दिल्ली सरकारने करोना काळात नवे अबकारी धोरण आखून त्या माध्यमातून मनी लाँडरींग केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षातील इतर नेत्यांवर ठेवण्यात आला आहे. हे धोरण नंतर रद्द केले असले तरी या गुन्ह्याखाली दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया दीड वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही २१ मार्च २०२४ मध्ये अटक करण्यात आली. लोकसभेदरम्यान पक्षाचा प्रचार करण्यासाठी त्यांना काही दिवसांचा जामीन देण्यात आला होता. २०२४ च्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने इंडिया आघाडीत प्रवेश केला. मात्र त्यांना केवळ तीनच जागा जिंकता आल्या. आम आदमी पक्षाचा गड मानल्या जाणाऱ्या दिल्लीत काँग्रेस आणि ‘आप’ला एकही जागा जिंकता आली नाही.


ईडीच्या कारवाई आधी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे नायब राज्यपाल यांच्यात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. केंद्रीय गृहखात्याने दिल्ली सरकारला असलेले प्रशासकीय अधिकार काढून घेतल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आणि बदली करण्याचे अधिकार नायब राज्यपाल यांच्या हाती गेले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा नवा अध्यादेश काढून आपला निर्णय काम ठेवला.


Read More
Lok Sabha today
10 Photos
“आम्ही पाचव्या टप्प्यातच ३०० पार”, अमित शाहांचा दावा; अरविंद केजरीवाल म्हणाले…

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि जयराम रमेश यांनीदेखील याआधी भाजपाचा पराभव होणार असल्याचे म्हंटले आहे.

kejriwal arrest
13 Photos
अरविंद केजरीवालच नाही, तर त्यांच्या आधी ‘या’ पाच मुख्यमंत्र्यांना झाली आहे अटक

या वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे (जेएमएम) कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांच्यावर कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणात…

arvind kejariwal protest news
9 Photos
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ ‘इंडिया’ आघाडीचे ‘सत्याग्रह’ आंदोलन! नेमकं काय घडलं?

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर्स घेऊन केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शने केली.

Arvind Kejriwal
9 Photos
घरचं अन्न, औषध आणि कौटुंबिक भेट; तुरुंगात असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्या ‘या’ परवानग्या

Delhi Chief Minister Arvind Kejriwal Arrested : अरविंद केजरीवाल यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली असून २८ मार्चपर्यंत ईडी कोठडीत ते…

Political leaders AI photos
9 Photos
कुणी आंबे तर कुणी कमळाची फुलं विकतंय, शरद पवारांपासून मोदींपर्यंत दिग्गज राजकीय नेत्यांचे AI फोटोज

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तयार केलेली राजकीय नेत्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

AI genrated childhood photos
10 Photos
बालपण देगा देवा! योगी आदित्यनाथ ते केजरीवाल ‘हे’ १० मुख्यमंत्री लहानपणी कसे दिसायचे? AI ची कमाल

भारतातल्या १० मुख्यमंत्र्यांचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) मदतीने बनवलेले बालपणीचे फोटो.

cbi raid
9 Photos
मनीष सिसोदियांच्या घरी सीबीआयची छापेमारी, १० तासांपासून तपास सुरू, पाहा Photos

दिल्लीमधील उत्पादन शुल्क धोरणातील कथित अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासहीत २१ ठिकाणी छापेमारी केली आहे.

Narendra Modi Arvind Kejriwal
13 Photos
Photos : “८५०० कोटींचं विमान, १२ कोटीची गाडी, १० लाखाचा सूट”; मोदींच्या ‘फ्री रेवडी’ वक्तव्यावर आपचे ६ गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फ्री रेवडी’ संस्कृती देशाच्या विकासासाठी धोकादायक असल्याचं म्हटलं. यावर सत्ताधारी आपने मोदींना प्रत्युत्तर दिलंय.

7 Photos
Photos : आम आदमी पार्टीचे ‘मिशन गुजरात’ सुरु, अरविंद केजरीवाल – भगवंत मान गुजरात दौऱ्यावर

पंजाबमधील विजयानंतर ‘आम आदमी पार्टी’च्या मुख्यमंत्र्यांचा गुजरात दौरा, डिसेंबरमध्ये आहेत गुजरात विधानसभा निवडणुका

ताज्या बातम्या