scorecardresearch

डोंबिवली

डोंबिवली (Dombivli) हे महाराष्ट्र राज्याच्या ठाणे जिल्ह्यातील मोठ्या शहरांपैकी एक आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राचा बहुतांश भाग डोबिवलीमध्ये येतो. मुंबई, ठाणे, नवीमुंबई यांच्यानंतर प्रमुख शहरांमध्ये डोंबिवलीचा समावेश होतो. हे शहर पश्चिमेकडून चोळेगांव, पूर्वेकडून आयरेगाव, दक्षिणेकडून पाथर्ली आणि उत्तरेकडून ठाकुर्ली या गावांनी वेढलेले आहे. डोंबिवलीचा इतिहास फार जुना आहे. इ.स.१०७५ सालच्या राजा हरपाल देव याच्या शिलालेखात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. जेव्हा पोर्तुगीज डोंबिवलीमध्ये आले, तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपले तळ उभारले होते. इ.स.१७३० मध्ये पेशवेकाळात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. १९ व्या शतकात डोंबिवलीतील शेतकरी भात पिकवत असत आणि कल्याण ते मुंबई येथे त्याची विक्री करत असत. या ठिकाणी राहणारे मूळ निवासी ‘डोंब’ लोक होते आणि त्यांच्यावरुन या ठिकाणाला डोबिवली असे नाव पडले असे मानले जाते.


सुरुवातीला डोंबिवलीला शहराचे स्वरुप मिळाल्यावर तेथे नगरपालिका तयार करण्यात आली. पुढे ऑक्टोबर १९८३ मध्ये कल्याण आणि डोबिंवली दोन्ही शहरांची मिळून एकच महानगरपालिका स्थापन केली गेली. मुंबईतून मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोक डोंबिवलीमध्ये वास्तव्याला गेले. डोंबिवलीला प्रामुख्याने मराठी भाषिकांचे, मराठी संस्कृतीचे शहर मानले जाते. हिचा महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून गौरव होतो. डोंबिवलीची ओळख असलेल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेला १९९९ मध्ये सुरुवात झाली.


डोंबिवली शहराच्या लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळते. लोकसंख्येचा विचार करायला गेल्यास डोंबिवलीची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२,४६,३८१ इतकी आहे. हे शहर मुंबई लोकलसाठीही महत्त्वपूर्ण आहे. मुंबईतील बहुतांश नोकरदार वर्ग हा या शहरात वास्तव्याला असल्याने एका प्रकारे हे शहर आर्थिक राजधानी पाठबळ पुरवते असे म्हणता येईल.


Read More
Skipping
दोरीवरील उड्यांच्या स्पर्धेत डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचे जपानच्या स्पर्धत घवघवीत यश

जपानच्या कावासकी शहरात झालेल्या जागतिक दोरीवरील उड्यांच्या (जम्प रोप) स्पर्धेत महाराष्ट्राच्या चमूतील डोंबिवलीतील आठ स्पर्धक मुला, मुलींनी एकूण १६ पदके…

डोंबिवलीतून हद्दपार केलेला कोयत्याने दहशत माजविणारा टाटा पाॅवर भागातील गुंड अटकेत

ठाणे, रायगड आणि मुंबई जिल्ह्यातून मागील आठ महिन्यापूर्वी पोलीस उपायुक्तांच्या विशेष शाखेने तडीपार केलेला डोंबिवली जवळील पिसवली भागातील टाटा पाॅवर…

ravidar chvahan
डोंबिवलीतील चहावाला करणार सीमेवरील ३६ हजार जवानांचे रक्षाबंधन; ९३७ फुटाचा तिरंगा जवानांच्या स्वाधीन करणार

डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या एक चहावालाने भारतीय सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Dombivli Thane Parallel Road Resurvey Ordered by Commissioner
ठाणे – डोंंबिवली रेल्वे समांतर रस्त्याचे पुन्हा सर्वेक्षण करा, आयुक्त अभिनव गोयल यांचे निर्देश

रस्ते वाहतूक मार्गात सुसुत्रता येण्यासाठी विविध पर्यायी रस्त्यांची गरज आहे…

Illegal Chal demolished in Kumbharkhanpada area
डोंबिवलीत कुंभारखाणपाडा भागातील बेकायदा चाळी जमीनदोस्त

डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग कार्यक्षेत्रातील कुंभारखाणापाडा, सरोवरनगर भागातील भूमाफियांच्या बेकायदा चाळी ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांच्या तोडकाम पथकाने…

Potholes at Mothagaon Retibandar railway gate
डोंबिवलीत दिवा-वसई रेल्वे मार्गावरील मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकात खड्डे

डोंबिवली पश्चिमेतील दिवा-वसई रेल्वे मार्गावरील मोठागाव रेतीबंदर रेल्वे फाटकातील रस्त्यावर आणि दोन्ही बाजुच्या पोहच रस्त्यावर खड्डे पडले आहेत.

Non disabled passengers travelling in disabled coach at domivali station shocking video goes viral
मुंबई लोकलमध्ये भयंकर प्रकार; डोंबिवली स्टेशनवर दिव्यांगांच्या डब्यात काय घडलं पाहा, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Viral video: शारीरिकदृष्टया अपंग, कर्करोगी आणि गर्भवती महिला यांच्यासाठी रेल्वेच्या लोकल गाडय़ांमध्ये राखीव असलेल्या डब्यांतही शिरत आहे. इतर धडधाकट प्रवाशांचाच…

Women from various fields who attended the seminar.
लग्न संस्काराचे इव्हेंन्टमध्ये झालेले रूपांतर चिंतेचे; डोंबिवलीत ‘शुभमंगल सावधान’ परिसंवादातील जाणकारांचे मत

सुनिती रायकर, सई बने, ॲड. तृप्ती पाटील, संगीता पाखले, पूजा तोतला, लीना मॅथ्यू यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. नेत्रा फडके…

illegally parked vehicles causing traffic jams In Dombivli
डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील रस्त्यांना दुचाकी, मोटारींचा विळखा

डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागातील रस्ते, गल्ल्यांमध्ये मोटार वाहन चालक, दुचाकी स्वार मनमानी पध्दतीने वाहनतळाची सुविधा नसताना वाहने उभी…

Dombivli Citizens Slam Authorities Over Bad Road Condition With Bold Banner
डोंबिवलीत दिसली पुणेरी पाटी! खराब रस्त्यांवर लावला खतरनाक बॅनर; शेवटी लिहलं “हात लावेल तो नामर्द…” PHOTO पाहून पोट धरुन हसाल

Viral photo: एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. मात्र ही पुणेरी पाटी आता डोंबिवलीत पाहायला मिळालीय.

संबंधित बातम्या