गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
गडचिरोलीत कार्यरत असलेल्या ‘सर्च’ संचलित माँ दंत्तेश्वरी हॉस्पिटलमध्ये अलीकडेच ६१ वर्षीय प्रभा भरतकुमार आचाटी यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जातीतील महिलेवर झालेल्या अत्याचारप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांनी दाखल केलेली पुनरावलोकन याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली आहे.
गडचिरोलीतील गोंडवाना विद्यापीठात बी. ए. तृतीय सत्राच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात राजकीय विचारवंत म्हणून मनू, भीष्म आणि बृहस्पती यांच्यावरील प्रकरणांचा समावेश…