जालना जिल्हा (Jalna District) हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या मध्यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जालना जिल्हा हा पूर्वी निजामाच्या राज्याचा भाग होता. नंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामानंतर जालना औरंगाबाद जिल्ह्यामधील तालुका झाला. मग १ मे १९८१ रोजी जालना ‘जिल्हा’ म्हणून नावारूपास आला. जालना जिल्ह्याचे मुख्यालय जालना शहर असून ते महाराष्ट्र राज्याच्या व भारताच्या राजधानीशी ब्रॉडगेज रेल्वे लाईनने जोडलेले आहे.
जालना जिल्हा (Jalna District) हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्टील रिरोलिंग मिल, विडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे. जालना जिल्ह्यातील जनतेने मराठवाडा मुक्ती संग्रामात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.Read More
Jalna Municipal Commissioner Santosh Khandekar : तक्रारदार बांधकाम कंत्राटदाराकडून केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांनी मोठी रक्कम…
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्यांनी…