scorecardresearch

जसप्रीत बुमराह News

JASPRIT BUMRAH

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा भारतीय गोलंदाज आहे. तो भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सलग १४०-१४५ किमील प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. जसप्रीत बुमराह हा सध्या भारतातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. इन-स्विंगिंग यॉर्कर टाकण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. तो गुजरातकडून देशांतर्गत क्रिकेटचे सामने खेळतो. २०१३ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. ४ एप्रिल २०१३ रोजी त्याने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईकडून खेळत आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यामध्ये विराट कोहलीला बाद करत त्याने चांगला खेळ करुन दाखवला. या सामन्यामुळे तो प्रकाशझोतात आला. पुढे लसिथ मलिंगासह त्याने मुंबईच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी उचलली. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्समध्ये आहे. २०१६ मध्ये मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी जसप्रीत बुमराहला भारतीय संघामध्ये खेळवण्यात आले. अशा प्रकारे २६ जानेवारी २०१६ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याच महिन्यामध्ये तो पहिल्यांदा एकदिवसीय सामना देखील खेळला.


दोन वर्षांनंतर २०१८ मध्ये त्याला भारताकडून कसोटी सामने खेळायची संधी मिळाली. गोलंदाजी करताना त्याचा हात एका विशिष्ट कोनामध्ये झुकतो. हीच त्याची स्टाइल त्याची ओळख बनली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत पातळीवर चांगली कामगिरी केली. तो टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतग्रस्त असल्याने तो क्रिकेटपासून लांब आहे. याच कारणामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्येही सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.


Read More
team india
IND vs AUS: शेवटच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार? कोणाला संधी मिळणार?

Team India Playing 11 Prediction: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या टी -२० मालिकेतील शेवटचा सामना आज रंगणार आहे. दरम्यान…

jasprit bumrah record
IND vs AUS: बुमराहचं विकेट्सचं शतक थोडक्यात हुकलं! पण ऑस्ट्रेलियाविरूद्ध अशी कामगिरी करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज

Jasprit Bumrah Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या सामन्यात जसप्रीत बुमराहने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

icc punishes suryakumar bumrah after india pakistan asia cup match controversies
सूर्यकुमार, बुमरावर शिस्तभंगाची कारवाई

‘आयसीसी’च्या एलिट सामना निरीक्षक समितीच्या सदस्यांसमोर भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान १४, २१ आणि २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यातील घटनांची चौकशी…

ICC Banned Haris Rauf for 2 Matches Penalizes Suyakumar yadav Jasprit Bumrah
ICCने हारिस रौफवर घातली दोन सामन्यांची बंदी, सूर्या-बुमराहवरही कारवाई; IND vs PAK सामन्यांमधील वादावर उचललं मोठं पाऊल

ICC Hearing on IND vs PAK Asia Cup 2025 Match: भारत पाकिस्तान आशिया चषकातील सामन्यादरम्यान झालेल्या वादांवर आयसीसीने सुनावणी केली…

Suryakumar on T20 strategies
‘पॉवरप्ले’मध्ये बुमराची भूमिका निर्णायक! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेबाबत सूर्यकुमारचे वक्तव्य

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला आज, बुधवारी प्रारंभ होईल. ऑस्ट्रेलियाचा संघ ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये अतिशय आक्रमक शैलीत खेळण्यासाठी…

jasprit bumrah
IND vs WI: बुमराहच्या रॉकेट चेंडूवर वॉरिकनची दांडी गुल! स्टम्प उडून पडला लांब, पाहा Video

India vs West Indies 2nd Test: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहने जोमेल वॉरिकनला बाद करत माघारी…

Mohammed Siraj
ICC Ranking: दुसऱ्या कसोटीआधी सिराजसाठी आनंदाची बातमी! वाचा नेमकं काय घडलं?

Mohammed Siraj ICC Test Ranking: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला दुसऱ्या कसोटी सामन्याआधी आयसीसीच्या रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे.

Mohammad Siraj Statement on Jasprit Bumrah Back Injury and Not playing Oval Test vs england
“तो पुन्हा कधीच गोलंदाजी…”, ओव्हल कसोटीत बुमराह का खेळला नाही? मोहम्मद सिराजचा जस्सीच्या दुखापतीबाबत खुलासा

Mohammad Siraj on Jasprit Bumrah: मोहम्मद सिराजने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत जसप्रीत बुमराहच्या पाठीच्या दुखापतीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.

Jasprit Bumrah Gesture Wins Hearts Makes Big Sacrifice for Mohammad Siraj
IND vs WI: जसप्रीत बुमराहने जिंकली सर्वांची मनं, सिराजसाठी मैदानावर जे केलं ते पाहून सगळेच करतायत कौतुक; मैदानावर काय घडलं?

Jasprit Bumrah Mohammad Siraj: जसप्रीत बुमराहने पहिल्या कसोटीत ३ विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली. पण मैदानावरील त्याच्या एका कृतीने सर्वांची…

jasprit bumrah
IND vs WI 1st Test: जसप्रीत बुमराहच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद! कपिल देव यांना मागे टाकत केली दिग्गज खेळाडूशी बरोबरी

IND vs WI, Jasprit Bumrah Record: भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच कसोटी सामन्यात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

ताज्या बातम्या