scorecardresearch

जसप्रीत बुमराह Videos

JASPRIT BUMRAH

जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा भारतीय गोलंदाज आहे. तो भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. सलग १४०-१४५ किमील प्रतितास वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. जसप्रीत बुमराह हा सध्या भारतातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. इन-स्विंगिंग यॉर्कर टाकण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. तो गुजरातकडून देशांतर्गत क्रिकेटचे सामने खेळतो. २०१३ मध्ये तो आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. ४ एप्रिल २०१३ रोजी त्याने बंगळुरुविरुद्धच्या सामन्यामध्ये मुंबईकडून खेळत आयपीएलमध्ये पदार्पण केले. पहिल्याच सामन्यामध्ये विराट कोहलीला बाद करत त्याने चांगला खेळ करुन दाखवला. या सामन्यामुळे तो प्रकाशझोतात आला. पुढे लसिथ मलिंगासह त्याने मुंबईच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी उचलली. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्समध्ये आहे. २०१६ मध्ये मोहम्मद शमी दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या जागी जसप्रीत बुमराहला भारतीय संघामध्ये खेळवण्यात आले. अशा प्रकारे २६ जानेवारी २०१६ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याच महिन्यामध्ये तो पहिल्यांदा एकदिवसीय सामना देखील खेळला.


दोन वर्षांनंतर २०१८ मध्ये त्याला भारताकडून कसोटी सामने खेळायची संधी मिळाली. गोलंदाजी करताना त्याचा हात एका विशिष्ट कोनामध्ये झुकतो. हीच त्याची स्टाइल त्याची ओळख बनली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत पातळीवर चांगली कामगिरी केली. तो टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज आहे. गेल्या काही महिन्यांपासून दुखापतग्रस्त असल्याने तो क्रिकेटपासून लांब आहे. याच कारणामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्येही सहभागी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.


Read More

ताज्या बातम्या