scorecardresearch

जसप्रीत बुमराह Photos

JASPRIT BUMRAH

भारतीय संघाचं प्रमुख अस्त्र. भारतीय संघात बुमराह आहे म्हणजे ४ षटकं वजा करूनच खेळा असं माजी खेळाडू प्रतिस्पर्धी संघांना सांगताना दिसतात. नवा चेंडू असो किंवा मधली षटकं किंवा हाणामारीची- बुमराह येतो आणि विकेट मिळवतो. त्याच्या गोलंदाजीवर धावा करणं जिकिरीचं असतं. आयपीएल स्पर्धेतील मुंबई इंडियन्स संघाचे टॅलेंट स्काऊट आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक जॉन राईट यांनी बुमराहला हेरलं. त्याची अॅक्शन फलंदाजांना बुचकळ्यात टाकू शकते हे ओळखून त्यांनी संघव्यवस्थापनाला माहिती दिली. लिलावात मुंबई इंडियन्स संघाने बुमराहला ताफ्यात समाविष्ट केलं. तेव्हापासून बुमराह मुंबई इंडियन्स संघाचा आधारवड झाला आहे. दुखापतींमुळे बुमराह तिन्ही प्रकारात सगळे सामने खेळत नाही. वर्कलोड मॅनेजमेंटनुसार त्याला खेळवलं जातं. घोटीव यॉर्कर, प्रतिस्पर्धी फलंदाजाच्या हेल्मेटचा वेध घेणारा उसळता चेंडू, फसवा स्लोअरवन, बुमराहच्या भात्यात असंख्य अस्त्रं आहेत. तो ती परजतो आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना नामोहरम करतो. दोन वर्षांपूर्वी भारताने टी२० वर्ल्डकप जिंकला तेव्हा बुमराहला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. घरच्या मैदानावर संघाला जिंकून देण्यासाठी बुमराह आतूर आहे.


Read More
List of bowlers who have been hit first ball six by Vaibhav Sooryavanshi
8 Photos
IPL 2026: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने ‘या’ दिग्गज गोलंदाजांविरूद्ध पहिल्याच चेंडूवर मारलाय षटकार; पाहा संपूर्ण यादी

Vaibhav Sooryavanshi Sixes: वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये अनेक मोठमोठ्या गोलंदाजांच्या पहिल्या चेंडूवर दणदणीत षटकार खेचले आहेत. या खेळाडूंची यादी पाहूया.

Mumbai Indians All Captains Full List Who leads MI First Rohit sharma to jasprit bumrah marathi news
11 Photos
मुंबई इंडियन्सचा सर्वात पहिला कॅप्टन माहितीये का? सर्व कर्णधारांची यादी एकाच क्लिकवर; हार्दिकचा रेकॉर्ड पाहून डोक्याला लावाल हात

Mumbai Indians Captain’s List: जसप्रीत बुमराहचा मुंबई इंडियन्स ११वा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी संघाचं नेतृत्त्व कोणी कोणी केलं, जाणून घेऊया.

sanjana ganesan
6 Photos
Sanjana Ganesan: बुमराहच्या मॅच फीपेक्षा पत्नी संजनाची कमाई कितीतरी पटीने जास्त? एका सामन्याचे मानधन ऐकून व्हाल थक्क

Sanjana Ganesan Earning: जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन एक सामना होस्ट करण्यासाठी किती मानधन घेते? जाणून घ्या.

arshdeep singh
6 Photos
T20 WC: टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज! अर्शदीप सिंगकडे नंबर १ बनण्याची संधी

Most Wickets For India In T20 World Cup: कोण आहेत टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज? जाणून घ्या.

ICC Ranking 2025 Team India 6 players are No 1 Rohit Sharma Ravindra Jadeja Varun Chakravarthy
8 Photos
ICC Ranking 2025 मध्ये भारतीय खेळाडूंचा जलवा! टीम इंडियाचे ६ खेळाडू ‘वर्ल्ड नंबर वन’, रोहित-अभिषेक अन्.. पाहा यादी

Indian Players in ICC Ranking: आयसीसी क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला. भारताचे तब्बल ६ खेळाडू आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानी…

Team india
6 Photos
Year Ender: बुमराह की अर्शदीप? २०२५ मध्ये टीम इंडियाचा नंबर १ गोलंदाज कोण? यादी पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Most T20I Wickets For Team India In 2025: कोण आहेत २०२५ मध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज? जाणून…

जसप्रीत बुमराह
6 Photos
Team India: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज; जसप्रीत बुमराह कितव्या स्थानी?

Most Wickets For Team India In T20I Cricket: कोण आहेत टीम इंडियासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज?

Suryakumar Yadav on What He Would Like to Tattoo On His Teammates Rohit Sharma Garden Virat Kohli GOAT
9 Photos
रोहित शर्मासाठी गार्डन, तर सलमान आघासाठी…; सूर्याला ‘या’ खेळाडूंसाठी कोणते टॅटू काढायला आवडतील? कॅप्टनची भन्नाट उत्तरं

Suryakumar Yadav on Tattoos: सूर्यकुमार यादव आणि टॅटू हे जणू एक समीकरण आहे. त्याने त्याच्या शरीरीवर अनेक विविध टॅटू काढले…

From Abhishek Sharma to Bumrah... these 5 Indian players can do well in the final against Pakistan
9 Photos
Asia Cup 2025 Final: टीम इंडियाचे ‘हे’ पाच रत्न अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाजू शकतात पाणी…

Asia Cup final : आशिया चषक २०२५ चा अंतिम सामना आज होणार आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान…

Jasprit bumrah
6 Photos
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज! बुमराह नव्हे, तर ‘हा’ गोलंदाज अव्वल स्थानी

Most Wickets In Asia Cup 2025: कोण आहेत आशिया चषकात सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज? जाणून घ्या.

ताज्या बातम्या