Page 18 of महाराष्ट्रातील पावसाळा News

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलमट्टी धरणातील विसर्गासंदर्भात राज्य सरकारला सल्ला दिला आहे.

महाराष्ट्राच्या ज्या भागांमध्ये पावसाचा आणि त्यापाठोपाठ पुराचा तडाखा बसला आहे, अशा भागांसाठी राज्य सरकारने मदतीची घोषणा केली आहे.

कोल्हापूर जलमय झाल्यानंतर त्या दिशेने जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या आहे. त्यामुळे या वाहनांमधील प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे.

कोल्हापूरमध्ये तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर शनिवारी सकाळी पावसानं काहीशी उघडीप दिली आहे.

राज्यात एकीकडे मुसळधार पावसाचं थैमान सुरू असताना त्याचा सामना करण्यासाठी राज्य सरकारचं काय नियोजन आहे, याची माहिती अजित पवारांनी दिली…

कोकणात २३ आणि २४ जुलै रोजी म्हणजे जवळपास पुढच्या २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मदतीचं आवाहन केलं आहे.

रायगड, ठाण्याप्रमाणेच कोल्हापूरमध्ये देखील तुफान पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी खडकवासला धरण आज ९६ टक्के भरलं असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

हवामान विभागाने खबरदारी घेण्याचा इशारा दिला असून गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन केले आहे.

कांदा पिकाला वेळेआधी हजर झालेल्या पावसाचा फटका बसला असून कांद्यांची बाजारातील आवक घटल्याने त्याचे भाव वाढू लागले आहेत.

मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरिपीट उडवली. हवामाने विभागाच्या अंदाजाप्रमाणेच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबई पुन्हा एकदा तुंबली.