scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

नाशिक News

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
uday samant reflects on journey from guwahati
गोहाटीला गेलो नसतो तर…मंत्री उदय सामंत हे काय बोलून गेले ?

सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि शिक्षक गौरव समितीच्या वतीने आयोजित शिक्षक गौरव सोहळ्यात सामंत यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

Bala Nandgaonkar, senior leader of Maharashtra Navnirman Sena.
बरे झाले नाशिकने राजसाहेबांना नाकारले…मनसेचे बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले ?

नांदगावकर मोर्चात सहभागी होण्यासाठी नाशिक येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर उपस्थित…

Maratha Vidya Prasarak Samaj nashik
मविप्रच्या खासगी विद्यापीठाने ४०० कोटींच्या जागेचे काय होणार ?

मराठा समाजाची मविप्र ही राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची बलाढ्य शिक्षण संस्था आहे. खासगी विद्यापीठ स्थापनेवरून विद्यमान कार्यकारी मंडळात दुफळी माजली आहे.

Dispute between Hemant Godse and Chhagan Bhujbal over the electrical laboratory
इलेक्ट्रिक प्रयोगशाळेवरून हेमंत गोडसे- छगन भुजबळ यांच्यात वाद का उफाळला ?

केंद्रीय विद्युत संशोधन संस्थेच्या (सीपीआरआय) प्रादेशिक इलेक्ट्रिक तपासणी प्रयोगशाळेवरून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार)…

uday smant urges sawan to take responsibility of other libraries in maharashtra
सावानाने अन्य ग्रंथालयांचे दायित्व स्वीकारावे; उदय सामंत यांची अपेक्षा

येथील सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समिती यांच्या सहकार्याने आयोजित शिक्षक गौरव सोहळ्यात सामंत यांनी मार्गदर्शन केले.

Cargo vehicle-car collision in Nashik
नाशिकमध्ये मालवाहू वाहन-मोटारीची धडक; तीन मजुरांचा मृत्यू,१२ जखमी

गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बोरदैवत व हनुमंतपाडा येथील १५ ते २० महिला, पुरूष मजुरीसाठी खोडबेल येथे…

clean air survey loksatta
नाशिकमधील स्वच्छ हवा गेली कुठे ? स्वच्छ वायू सर्वेक्षणात १६ वा क्रमांक

कधीकाळी स्वच्छ हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची ओळख कायम राखण्यासाठी आणखी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.