scorecardresearch

नाशिक Photos

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
pankaja munde
9 Photos
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?

महायुतीमध्ये अनेक जागांवरील तिढा सुटलेला नाही. यामध्ये नाशिक जागेचाही समावेश आहे.

babanrao gholap joined shinde group
9 Photos
Loksabha Election 2024: शिवसेना उबाठा गटाला धक्का, बबनराव घोलप आणि माजी आमदार संजय पवार समर्थकांसह शिंदे गटात

शिवसेना उबाठा गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

PM Narendra Modi Nashik Visit Updates in Marathi
15 Photos
PHOTOS : काळाराम मंदिरात साफसफाई ते रामकुंडावर पूजन, पाहा मोदींची भक्तिमय रुपे

PM Narendra Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौऱ्यावर काळाराम मंदिरात भेट दिली. तसंच, रामकुंड येथे पूजन…

Shravani Somvar 2023 Brahmagiri Nashik
9 Photos
Photos: तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त तरुणांचा आणि महिलांचा उत्साह शिगेला; ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठी प्रचंड गर्दी

त्र्यंबकेश्वर देवस्थानने गर्दीच्या पार्श्वभूमीवर, अतिविशेष (व्हीआयपी) दर्शन बंद ठेवले आहे.

Balasaheb-Thorat-Nana-Patole-Satyajeet-Tambe-1
24 Photos
“दिल्लीतील नेते मला म्हणाले की, तुला जाहीर माफी मागावी लागेल, मी म्हटलं…”, सत्यजीत तांबेंचा मोठा गौप्यस्फोट

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून बंडखोरीचा आरोप झालेले काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते नेमके…

Balasaheb Thorat Shubhangi Patil Satyajeet Tambe
24 Photos
Photos : धनाढ्य उमेदवार, बोगस मतदान ते काँग्रेसने प्रचार न केल्याचा आरोप, वाचा शुभांगी पाटलांची महत्त्वाची विधानं…

मविआच्या उमेदवार असूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शुभांगी पाटील यांचा प्रचार केला नाही, अनेक ठिकाणी त्यांचे बुथही नव्हते, संगमनेरमध्ये बोगस मतदान…

Satyajeet Tambe 3
21 Photos
Photos : कपिल पाटील, नाना पटोले ते भाजपा; नाशिकमध्ये सत्यजीत तांबे नेमकं काय म्हणाले? वाचा महत्त्वाची विधानं

शिक्षक आमदार कपिल पाटलांनी पाठिंबा दिल्यावर सत्यजीत तांबेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (१८ जानेवारी) नेमकं काय म्हणाले याचा…

Sudhir Tambe Nana Patole Sonia Gandhi
12 Photos
Photos : ‘आमच्या पक्षश्रेष्ठींनाही बरेच गैरसमज’ ते ‘भाजपाचा पाठिंबा घेणार का?’; काँग्रेस बंडखोर सुधीर तांबेंची महत्त्वाची विधानं

काँग्रेसचे बंडखोर नेते डॉ. सुधीर तांबेंना सोमवारी (१६ जानेवारी) निफाड येथे प्रचारासाठी आले असताना नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

Prithviraj Chavan Satyajeet Tambe Sudhir Tambe
25 Photos
Photos : काँग्रेससमोर मोठा पेच, काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेचं गटनेतेपद बंडखोर सुधीर तांबेंकडे, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस शिस्तपालन समितीचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी (१६ जानेवारी) काँग्रेसमधील बंडखोरीवर केलेल्या महत्त्वाच्या विधानांचा…

Devendra-Fadnavis Satyajeet Tambe BJP
21 Photos
Photos : फडणवीसांनी सांगितलं तांबेंविरोधातील अपेक्षित भाजपा उमेदवाराचं नाव, म्हणाले, “आमची मनापासून इच्छा होती की…”

तांबेंविरोधात भाजपाचा उमेदवार कोण होता असाही प्रश्न भाजपाला विचारण्यात आला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट…

Devendra Fadnavis Satyajeet Tambe Balasaheb Thorat
27 Photos
Photos : तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? सत्यजीत तांबे म्हणाले, “एका उदात्त हेतूने…”

पत्रकारांनी सत्यजीत तांबेंना काँग्रेस-भाजपाची एकत्र येण्याची काही रणनीती आहे का? तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? असे प्रश्न विचारले. त्यावर…