scorecardresearch

नाशिक News

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
dindori lok sabha seat, bjp s dindori lok sabha candidate nomination postponed, nashik lok sabha seat, no fix candidate in nashik of mahayuti, nashik news, lok sabha 2024, election news, marathi news, nomination form filling,
आता शक्ती प्रदर्शनाची चढाओढ, नाशिकमुळे महायुतीचा दिंडोरीचा अर्ज भरण्याचा मुहूर्त लांबणीवर

महाविकास आघाडीच्यावतीने नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला जाणार असताना महायुतीचा नाशिकचा उमेदवार निश्चित नसल्याने…

Voter Sympathy, Voter Sympath gain crowd in public meeting, Chhagan Bhujbal, sharad pawar, Chhagan Bhujbal said Voter Sympathy will not win Election, nashik lok sabha seat, lok sabha 2024, elction campaign, mahayuti seat allocation,
सहानुभूतीमुळे शरद पवार यांच्या सभांना गर्दी – छगन भुजबळ यांचे मत

अनेक जण हे राष्ट्रवादी शरद पवार गटातून अजित पवार गटात आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात शरद पवार यांच्याविषयी सहानुभूती असल्याने…

nashik lok sabha seat, mahayuti, lok sabha 2024, Mahayuti Candidature competition for nashik, marathi news, ncp ajit pawar, shivsena Eknath shinde, bjp, chhagan Bhujbal, Hemant godse, marathi news, nashik news, politics news,
नाशिकमध्ये महायुतीतंर्गत उमेदवारीसाठी स्पर्धा

उमेदवारी अर्ज दाखल करणे अनेकांनी सुरु केल्यानंतरही नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण, हा प्रश्न कायम आहे. या प्रश्नाचे उत्तर…

Chhagan Bhujbal On Manoj Jarange
“मनोज जरांगे पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते”; छगन भुजबळ यांचा खोचक टोला

मनोज जरांगे-पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे-पाटील…

Mathadi workers warn about boycott of voting if no solution is found on levy
लेव्हीविषयी तोडगा न निघाल्यास मतदानावर बहिष्कार, माथाडी कामगारांचा इशारा

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर माथाडी मंडळाचे सुमारे पाच हजार कामगार व त्यांचे कुटुंबिय बहिष्कार टाकण्याच्या मनस्थितीत असल्याकडे महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट…

Dilemma of onion growers for 14 months in last five years
गेल्या पाच वर्षांतील १४ महिने कांदा उत्पादकांची कोंडी

देशवासीयांना स्वस्तात कांदा उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत तीन वेळा निर्यातीवर बंदी घातली, दोन वेळा किमान निर्यातमूल्य वाढवले…

retired officer died due to swine flu in Malegaon
स्वाईन फ्लू आजाराने मालेगावात निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू

मालेगावातील निवृत्त अधिकाऱ्याचा स्वाईन फ्लू आजाराने मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपाय योजना हाती घेतल्या आहेत.

BJP ignores the issues of inflation and unemployment Congress alleges in nashik
भाजपकडून महागाई, बेरोजगारीच्या मुद्यांना बगल; काँग्रेसचा आरोप

भाजपकडून प्रचारात धर्माचा वापर आणि मंगळसूत्राचा विषय घेऊन जनतेची दिशाभूल आणि महिलांचा अपमान केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र…

Jiva Pandu Gavit is owner of three and a half crores property
पायी मोर्चा काढणारे जिवा पांडू गावित साडेतीन कोटींचे धनी

नाशिक-मुंबई पायी मोर्चा काढणारे आणि नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कित्येक दिवस ठाण मांडून अविरत संघर्ष करणारे माकपचे माजी आमदार जिवा पांडू…

Watch out for suspicious financial transactions in elections Expenditure Inspector advises
निवडणुकीत संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवा, खर्च निरीक्षकांची सूचना

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवावी. यंत्रणांनी अचूकतेने व पूर्ण क्षमतेने काम करावे, अशी सूचना निवडणूक आयोगाने नियुक्त…

Swami Shantigiri Maungiri Maharaj has property worth 39 crores
नाशिक : शांतीगिरी महाराजांची ‘श्रीमंती’, ३९ कोटींची मालमत्ता

राज्यातील विविध भागात जमीन, भूखंड व अन्य स्थावर मालमत्ता असणारे आणि थोडीथोडकी नव्हे तर, नऊ वाहने दिमतीला ठेवणारे स्वामी शांतिगिरी…