scorecardresearch

नाशिक Photos

लोकसत्ता च्या या सदरामध्ये तुम्ही नाशिक शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे वाचू शकता. महाराष्ट्राच्या उत्तर भागात असलेले नाशिक (Nashik)हे शहर भारतातील प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. भारतातील सर्वांत वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी ते एक शहर आहे. सह्याद्रीच्या पठारावर आणि गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या नाशिक शहरात मराठी भाषा बोलली जाते. नाशिक शहराच्या आसपास अनेक धार्मिक स्थळ आहे. त्यापैकी दक्षिण दिशेला त्रिरश्मी बौद्ध लेणी आहेत; उत्तर दिशेला चांभार लेणी व रामशेज किल्ला आहे. पश्चिम दिशेला त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक शहराच्या नावाबाबत विविध मतप्रवाह आहेत.


नऊ शिखरांचे शहर म्हणून ‘नवशिख’ आणि नंतर त्याचा अपभ्रंश होऊन नाशिक, असे झाले असावे, असाही एक मतप्रवाह आहे. त्याशिवाय नाशिक नावाचा संबंध रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. पौराणिक संदर्भांनुसार याच ठिकाणी लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक (संस्कृत भाषेमध्ये ‘नासिका’) कापले होते. म्हणून या ठिकाणाचे नाव ‘नाशिक’ असे पडले असावे, असे मानले जाते. पौराणिक संदर्भांनुसार, नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी वनवासाच्या काळात रामाने वास्तव्य केले होते. येथे सध्या सीता गुंफा व पेशव्यांनी बांधलेले काळाराम मंदिर हे प्रेक्षणीय स्थळ आहे. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळा नाशिक येथे भरतो. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांद्याचे उत्पादन होते. तसेच वाइननिर्मिती आणि तांब्या-पितळेच्या भांड्यांसाठी नाशिक शहर विशेष प्रसिद्ध आहे.


महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक हे मुंबई, पुणे या शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. नाशिक शहरातील स्थानिक घडामोडींपासून राजकीय घडामोडींपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या येथे तुम्ही वाचू शकता.


Read More
manikrao kokate rummy news
9 Photos
Manikrao Kokate Statement: रमीच्या व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त विधानांची मालिका

Agriculture Minister Manikrao Kokate All Controversial Statements : कृषिमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळल्यापासून वादग्रस्त विधानांनी कोकाटे हे सातत्याने चर्चेत राहिले आहेत.

manikrao kokate net worth
10 Photos
Manikrao Kokate Net Worth: थेट विधानसभेत रमी; व्हिडिओत दिसणारे माणिकराव कोकाटे कोट्यधीश; वाचा मालमत्तेची माहिती

Manikrao Kokate Net Worth: पावसाळी अधिवेशनादरम्यान कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सभागृहातील बाकावर बसून ऑनलाइन रमी (पत्त्यांचा खेळ) खेळत असल्यामुळे प्रचंड चर्चेत…

Why BJP Wants Sudhakar Badgujar
9 Photos
सामान्य ठेकेदार ते कोट्यधीश, सुधाकर बडगुजर यांचा डोळे दिपवणारा उत्कर्ष; भाजपासाठी ते महत्त्वाचे का?

Sudhakar Badgujar BJP: शिवसेना (ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी देऊन सुधाकर बडगुजर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. स्थानिक नेत्यांचा तीव्र विरोध असताना बडगुजर…

Maharashtra Board 10th SSC 2025 Division Wise Results pune Nagpur sambhajinagar Mumbai Kolhapur Amravati nashik latur kokan
9 Photos
महाराष्ट्र दहावी बोर्डाचा निकाल जाहीर, कोकण टॉपवर! इतर विभागांची टक्केवारी काय?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून एकूण…

suhas kande nashik,
9 Photos
तुतारीचा प्रचार करत असल्याच्या आमदार सुहास कांदेंच्या आरोपांवर छगन भुजबळ म्हणाले…

नाशिकमधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत तर भुजबळ यांनीही उत्तर दिले…

pankaja munde
9 Photos
Lok Sabha Election 2024 : ना भुजबळ ना गोडसे, महायुतीकडून नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उमेदवारी? वाचा नेमकं काय घडतंय?

महायुतीमध्ये अनेक जागांवरील तिढा सुटलेला नाही. यामध्ये नाशिक जागेचाही समावेश आहे.

babanrao gholap joined shinde group
9 Photos
Loksabha Election 2024: शिवसेना उबाठा गटाला धक्का, बबनराव घोलप आणि माजी आमदार संजय पवार समर्थकांसह शिंदे गटात

शिवसेना उबाठा गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

PM Narendra Modi Nashik Visit Updates in Marathi
15 Photos
PHOTOS : काळाराम मंदिरात साफसफाई ते रामकुंडावर पूजन, पाहा मोदींची भक्तिमय रुपे

PM Narendra Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौऱ्यावर काळाराम मंदिरात भेट दिली. तसंच, रामकुंड येथे पूजन…

Shravani Somvar 2023 Brahmagiri Nashik
9 Photos
Photos: तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त तरुणांचा आणि महिलांचा उत्साह शिगेला; ब्रम्हगिरी प्रदक्षिणेसाठी प्रचंड गर्दी

त्र्यंबकेश्वर देवस्थानने गर्दीच्या पार्श्वभूमीवर, अतिविशेष (व्हीआयपी) दर्शन बंद ठेवले आहे.

Balasaheb-Thorat-Nana-Patole-Satyajeet-Tambe-1
24 Photos
“दिल्लीतील नेते मला म्हणाले की, तुला जाहीर माफी मागावी लागेल, मी म्हटलं…”, सत्यजीत तांबेंचा मोठा गौप्यस्फोट

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून बंडखोरीचा आरोप झालेले काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते नेमके…