scorecardresearch

About News

प्रवीण तरडे News

प्रवीण विठ्ठल तरडे ( Pravin Tarde) हे मराठी सिनेसृष्टीतील एक यशस्वी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९७४ रोजी पुण्यामध्ये (Pune) झाला. कलाविश्वाची आवड असणाऱ्या प्रवीण तरडेंनी कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडरसारख्या अनेक एकांकिका स्पर्धा जिंकल्या. याच काळामध्ये त्यांना व्यावसायिकरित्या काम करायची संधी मिळू लागली. त्यांनी लेखक म्हणून बरीच वर्ष काम केलं आहे.

सुरुवातीच्या काळामध्ये झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांमध्ये ते संवादलेखनाचे काम करत होते. ‘रेगे’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ या चित्रपटांचे लेखन त्यांनी केले आहे. लेखन करता-करता ते सहाय्यक दिग्दर्शनाचे काम करु लागले.

२०१५ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘देऊळ बंद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण प्रवीण तरडेंना खरी प्रसिद्धी मिळवून दिली २०१८ सालच्या ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाने. या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्कारदेखील मिळाले. या चित्रपटाचे अन्य भाषांमध्ये रिमेक्स करण्यात आले. २०२२ मध्ये त्यांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट खूप गाजला. याच वर्षी त्यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटामध्ये प्रवीण तरडे ‘प्रतापराव गुजर’ यांची प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहेत. त्यांनी पत्नी स्नेहल तरडे देखील अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.
Read More
prasad oak share video of dharmaveer 2 movie muhurta pravin tarde
Video: ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पडला पार; अभिनेता प्रसाद ओक व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “साहेबांच्या…”

बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याला ‘या’ कलाकारांनी लावली हजेरी

Snehal Tarde shares special post on husband pravin tarde birthday occasion
प्रवीण तरडेंच्या पत्नीने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “धकाधकीच्या जीवनात…”

प्रवीण तरडेंच्या वाढदिवसानिमित्ताने स्नेहल तरडेने केलेली खास पोस्ट चर्चेत

Pravin tarde
“सुभेदारांचा सिंहगडावरील पराक्रम…”, दिग्पाल लांजेकरांबरोबर ‘सुभेदार’ पाहून प्रवीण तरडेंनी केली पोस्ट, प्रतिक्रिया देत म्हणाले…

प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

pravin tarde got adhik maas gift from mother in law
“जावईबापू जिंदाबाद”, सासरहून प्रवीण तरडेंना मिळालं अधिकमासाचं वाण, पत्नीने शेअर केला व्हिडीओ

अधिकमासानिमित्त प्रवीण तरडेंना सासरहून मिळाली खास भेट, पत्नी व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

dharmveer 2 poster comment
“मुख्यमंत्र्यांंचं प्रमोशन…”, ‘धर्मवीर २’च्या पोस्टरवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स, म्हणाले “दिघेंची पुण्याई…”

‘धर्मवीर २’च्या पोस्टरवर नेटकऱ्यांच्या कमेंटस, म्हणाले “गेलेली इज्जत..”

pravin tarde reveals his friends worked for free in his film mulshi pattern when he had no money
“माझ्या मित्रांनी पैसे न घेता…”, प्रवीण तरडेंचा ‘मुळशी पॅटर्न’बद्दल खुलासा; म्हणाले, “अडचणीच्या काळात…”

“…म्हणून मित्रांचा दिग्दर्शक अशी ओळख मिळाली”, प्रवीण तरडेंनी सांगितला ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटादरम्यानचा अनुभव

ताज्या बातम्या

मराठी कथा ×