scorecardresearch

प्रवीण तरडे Videos

प्रवीण विठ्ठल तरडे ( Pravin Tarde) हे मराठी सिनेसृष्टीतील एक यशस्वी लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९७४ रोजी पुण्यामध्ये (Pune) झाला. कलाविश्वाची आवड असणाऱ्या प्रवीण तरडेंनी कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडरसारख्या अनेक एकांकिका स्पर्धा जिंकल्या. याच काळामध्ये त्यांना व्यावसायिकरित्या काम करायची संधी मिळू लागली. त्यांनी लेखक म्हणून बरीच वर्ष काम केलं आहे.

सुरुवातीच्या काळामध्ये झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांमध्ये ते संवादलेखनाचे काम करत होते. ‘रेगे’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’ या चित्रपटांचे लेखन त्यांनी केले आहे. लेखन करता-करता ते सहाय्यक दिग्दर्शनाचे काम करु लागले.

२०१५ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘देऊळ बंद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण प्रवीण तरडेंना खरी प्रसिद्धी मिळवून दिली २०१८ सालच्या ‘मुळशी पॅटर्न’ या सिनेमाने. या चित्रपटासाठी त्यांना अनेक पुरस्कारदेखील मिळाले. या चित्रपटाचे अन्य भाषांमध्ये रिमेक्स करण्यात आले. २०२२ मध्ये त्यांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट खूप गाजला. याच वर्षी त्यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटामध्ये प्रवीण तरडे ‘प्रतापराव गुजर’ यांची प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहेत. त्यांनी पत्नी स्नेहल तरडे देखील अभिनय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.
Read More
romantic scene in the movie pravin Tarde told an story on the sets
Digital Adda: चित्रपटातील ‘तो’ रोमँटिक सीन; प्रवीण तरडेंनी सागिंतला सेटवरचा भन्नाट किस्सा

पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा प्रेक्षकांना ‘बलोच’मध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या…

'बलोच'च्या शूटींDigital ADDA With Baloch New Marathi Movie गदरम्यान घडलेले किस्से
पाकिस्तान बॉर्डर, ५० ड्रिगी तापमानात शूट अन्…, ‘बलोच’च्या शूटींगदरम्यान घडलेले किस्से

पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा प्रेक्षकांना ‘बलोच’मध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या…

ताज्या बातम्या

मराठी कथा ×