पुणे शहर पोलीस विभाग (PCPD) हा पुण्यामध्ये सुव्यवस्था आणि कायद्याचे पालन व्हावे यासाठी सतत तत्पर असतो. हा विभाग महाराष्ट्र पोलीस दलाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. पुण्यातील पोलीस दलाचे प्रमुख पोलीस आयुक्त असतात. या पदासाठी आय.ए.एस अधिकाऱ्याची नेमणूक राज्य सरकारमधील गृह खात्याद्वारे करण्यात येते. डिसेंबर २०२२ मध्ये पुणे पोलीस दलाच्या प्रमुखपदी रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. पुण्यामध्ये असलेल्या आयुक्तालयाचे बांधकाम १९६५ मध्ये पूर्ण झाले होते. जुलै १९६५ मध्ये त्या वास्तूचा वापर पोलीस दलाकडून करायला सुरुवात झाली. पुण्यामध्ये एकूण ३० पोलीस ठाणी आहेत. येथील वाहतूकीवरुन नियंत्रण ठेवायचे काम पुणे पोलीस दलाच्या वाहतूक नियंत्रण कक्षामार्फत पार पाडले जाते. पेशव्यांच्या काळामध्ये कोतवाल यांच्या स्वरुपामध्ये पोलीस यंत्रणा अस्तित्त्वात होती असे म्हटले जाते. तेव्हा सोमवार पेठ, वेताळ पेठ, रविवार पेठ आणि बुधवार पेठ या ठिकाणी कोतवालांची ठाणी होती. ब्रिटीशांच्या आगमनानंतर १८६१ मध्ये पुण्यामध्ये अधिकृतपणे पोलीस दलाची स्थापना करण्यात आली. Read More
AI Powered E Challan System : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘ई-चलन’ कारवाई सुलभ करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस ‘व्हाॅट्सॲप-चॅटबाॅट’ प्रणाली विकसित…
Pranjal Khewalkar : खराडी पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांनी अमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा महत्त्वपूर्ण अहवाल न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेने (FSL)…